धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.
वेळेत न जेवणे, अर्धवट झोप, यासारख्या समस्यांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
वयस्कर माणसांसह तरुणांनाही याचा धोका संभवतो.
छाती दुखणे, जळजळ होणे, ही हृदयविकाराची प्राथमिक लक्षणे असू शकतात.
हृदयाला नियमित रक्त पुरवठा न झाल्यास श्वास घेताना त्रास होतो.
सतत थकवा, अशक्तपणा जाणवत असल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका.
चक्कर येणे, मळमळ होणे ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.
ही लक्षणे आढळल्यास, वेळ न घालवता, तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)