किडनी म्हणजेच मूत्रपिंड शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे
किडनी शरीरातील अशुद्ध रक्त स्वच्छ करते आणि विषारी घटक बाहेर काढते
मात्र बदललेली जीवनशैली आणि काही आजार किडनीच्या कार्यात अडथळे आणू शकतात
इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीने यावर अभ्यास केला आहे
या संस्थेनुसार जगभरात जवळपास 84 कोटी लोक किडनीच्या विविध आजारांनी ग्रस्त आहेत
जर तुम्हाला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर हे किडनी खराब झाल्याची लक्षणे असू शकतात
वारंवार लघुशंका येणे, लघुशंका करताना जळजळ होणे किंवा लघुशंका केल्यावर फेस तयार होणे हेदेखील किडनी खराब होण्याची लक्षणे असू शकतात
सकाळी उठल्यावर डोळ्याखाली सूज येणे हे किडनी खराब झाल्याचे लक्षण असू शकते
किडनी खराब झाल्यास त्वचेला खाज सुटणे, हे एक सामान्य लक्षण आहे
तज्ज्ञांच्या मते किडनी खराब झाल्यानंतर शरिरात पाणी साठते
त्यामुळे फुप्फ्फुसांवर दबाव पडतो आणि रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)