Wednesday, November 05, 2025

अननस खाण्याचे फायदे

Editor Name: Jaimaharashtra News

निरोगी शरीरासाठी विविध फळांचे सेवन केले जाते, ज्यामध्ये अननस या फळाचाही समावेश आहे

अननस फळामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते, यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते

तज्ज्ञांच्या मते अननस वजन कमी करण्यास मदत करते, कारण यात फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरीजचे कमी प्रमाणात असते

अननसमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे, शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते, असे मानले जाते

अननसमध्ये पोटॅशियम आणि फायबर असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो

अननसमधील व्हिटॅमिन सी आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहेत

पित्त, मधुमेही, पोटासंबंधी समस्या आणि मूत्रपिंडाने ग्रस्त असलेल्या लोकांनी अननस खाणे टाळावे

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)