बदलत्या जीवनशैलीमुळे बरेच लोक त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
''ऑस्टियोपोरोसिस'' या आजाराची लक्षणे सहसा दिसत नाही, मात्र यामुळे हळुहळु हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढतो.
WHO च्या मते, ऑस्टियोपोरोसिस आजार जगभरात पाहायला मिळत आहेत.
या आजाराचा परिणाम लाखो लोकांमध्ये पाहायला मिळत आहे.
ऑस्टियोपोरोसिसची लक्षणे कोणकोणती आहेत?
हाडांमधील वेदना: पाठ, कंबर दुखणे किंवा पडल्यामुळेही हाडं कमकुवत होणे.
व्यायाम न करणे, मद्यपान, धुम्रपान करणे किंवा एकाच ठिकाणी तासनतास बसल्यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो.
मात्र नियमित व्यायाम, पौष्टिक आहाराचे सेवन केल्याने ऑस्टियोपोरोसिसचा धोका टाळता येतो.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)