अनेकदा अज्ञानामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते, दंड भरावा लागतो किंवा सामान जप्त केले जाते
त्यामुळे विमानात चुकूनही ‘या’ वस्तू घेऊन जाऊ नयेत
सुरी, कात्री, ब्लेड, नेल कटर यांसारख्या धारदार किंवा टोकदार वस्तू विमानात नेण्यास मनाई आहे
फटाके, बारूद, रसायने यांसारखे स्फोटक साहित्य सुरक्षा नियमांनुसार बंदीस्त आहे
पेट्रोल, डिझेल, लायटर फ्लुइड, पेंट थिनर किंवा गॅसशी संबंधित कोणतेही पदार्थ विमानात नेण्यास सक्त मनाई आहे
100 मि.ली. पेक्षा जास्त द्रव पदार्थ विमानात (हँड बॅगेजमध्ये) घेऊन जाता येत नाहीत
तसेच, जास्त रोख रक्कम घेऊन प्रवास करत असल्यास ती संशयास्पद वाटल्यास तपासणी होऊ शकते
प्रवासापूर्वी आपल्या एअरलाईनच्या अधिकृत संकेतस्थळावर नियम व अटी नक्की तपासून घ्या