बदलते हवामान आणि व्यग्र दिनचर्येमुळे केस गळणे आणि कोंडा यांसारख्या समस्या उद्भवतात
केसांच्या समस्यांवर उपाय म्हणून बहुतांश लोक बाजारातून महागडे प्रोडक्ट्स खरेदी करतात
मात्र तरीही केसांसंबंधीत समस्या काही कमी होत नाही
केसांची निगा राखण्यासाठी पूर्वीच्या काळी बहुतांश लोक कोरफडीचा वापर करत असत
कोरफड हा एक नैसर्गिक उपाय आहे
तज्ञांच्या मते, केसांना कोरफड लावल्याने केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते
कोरफडमध्ये जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे असतात, जी केसगळती कमी करण्यास फायदेशीर असते
कोरफडमधील अ, क, ई आणि ब-12 हे जीवनसत्त्वे केसांच्या वाढीसाठी मदत करतात
केसांना कोरफड लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते
कोरफडमधील प्रोटीओलाइटिक एन्झाईम घटक (Proteolytic Enzymes) केसांना स्वच्छ ठेवण्यात मदत करतात
केसांमधील मृत पेशी कमी करण्यासाठी कोरफड उपयुक्त आहे
केसांना कोरफड लावल्याने केसांना येणारी खाज कमी होते
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)