Friday, October 10, 2025

दिवाळीत घरासमोर काढण्यासाठी ''''या'''' रांगोळ्या ठरतील आकर्षक

Editor Name: Jaimaharashtra News

मोराची रांगोळी : दिवाळीच्या सणाला घरासमोर काढा सुंदर मोराची रांगोळी.

फुलांची रांगोळी : खऱ्या फुलांचा वापर करून पर्यावरणपूरक रांगोळी काढू शकता.

ठिपक्यांची रांगोळी : ठिपक्यांचा कागद वापरून अथवा हाताने ठिपके काढून सुंदर आणि सोप्या पद्धतीने रंगीबेरंगी रांगोळी काढू शकता.

दिव्यांची रांगोळी : सणाला रोषणाई करणारे विविध आकाराचे दिवे वापरून त्याला रांगोळीत रुपांतरीत करता येते.

संस्कार भारती रांगोळी : विविध रंगांच्या मदतीने तुम्ही घरासमोर भव्य रांगोळी काढू शकता.

रांगोळी स्टिकरर्स : दिवाळी किंवा इतर सणांसाठी रांगोळी स्टिकरर्सचा पर्याय बाजारात सहज उपलब्ध असतो.

प्लास्टिक स्टेन्सिल्स (छापे) रांगोळी : विविध आकाराच्या प्लास्टिक स्टेन्सिल्सचा वापर करून दोन मिनिटांत सुबक रांगोळी काढता येते.