कमी बजेटमध्ये फिरायला जायचंय? ''या'' देशात नक्कीच जा

बहुतांश लोक भारताबाहेर फिरायला जाण्याचा बेत आखतात

मात्र कमी बजेटमुळे अनेकांची परदेशात जाण्याची इच्छा राहून जाते

जगात असे कोणते देश आहेत, जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये फिरू शकता? पाहुयात

भूतान: भूतान त्याच्या नैसर्गिक दृष्यांसाठी आणि उंच हिमालयीन शिखरांसाठी प्रसिद्ध आहे

भूतानमध्ये रोजचा अंदाजे खर्च 4 हजार 500 रुपयांपर्यंत येतो आणि भारतीय नागरिकांसाठी व्हिसा निशुल्क आहे

थायलंड: थायलंडमध्ये अनेक पर्यटनस्थळ आहेत, जे लोकप्रिय आहेत

थायलंडच्या ट्रिपसाठी प्रत्येकी 35 ते 50 हजार रुपयांपर्यंत बजेट लागते

व्हिएतनाम: व्हिएतनाम हा संस्कृती आणि निसर्गासाठी उत्तम पर्यटनस्थळ आहे

व्हिएतनामच्या प्रवासासाठी अंदाजे 50 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो

श्रीलंका: श्रीलंकामध्ये निर्सगरम्य दृष्य असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येतात

श्रीलंकेच्या ट्रिपसाठी बजेट साधारण 25 ते 40 हजार रुपयांदरम्यान असते

कंबोडिया: कंबोडिया हा प्राचीन मंदिरे आणि सांस्कृतिक वारशासाठी जगप्रसिद्ध आहे

कंबोडिया ट्रिपसाठी प्रति व्यक्ती 45 ते 60 हजार रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असतो