Tuesday, October 14, 2025

''ही'' आहेत भारतातील थंड हवेची ठिकाणं; जाणून घ्या

Editor Name: Jaimaharashtra News

ऋषिकेश (उत्तराखंड): हरिद्वारपासून ऋषिकेश हे ठिकाण 24 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणाला भेट देण्यासाठी सप्टेंबर ते नोव्हेंबर महिना अनुकूल आहे.

कुर्ग (कर्नाटक): म्हैसूरपासून कुर्ग 118 किलोमीटर अंतरावर आहे. कुर्ग या ठिकाणाला भेट देण्यासाठी उत्तम कालावधी ऑक्टोबर ते मार्च आहे.

मनाली (हिमाचल प्रदेश): थंड हवेचे ठिकाण म्हणून मनाली खूप प्रसिद्ध आहे. देश-विदेशातून लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात.

दार्जिलिंग (पश्चिम बंगाल): दार्जिलिंग त्याच्या नयनरम्य दृष्यांसाठी विशेष ओळखले जाते. येथे अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहेत.

उटी (तामिळनाडू): उटी हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. कोईम्बतूरपासून हे ठिकाण 86 किलोमीटर अंतरावर आहे.

मुन्नार (केरळ): मुन्नार हे ठिकाण केरळमधील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी भेट देण्यासाठी सप्टेंबर ते फेब्रुवारीचा कालावधी योग्य मानला जातो.