उकडीच्या मोदकासह सध्या विविध प्रकारचे मोदकदेखील बनवले जात आहेत. पाहुया मोदकाचे विविध प्रकार...
उकडीचे मोदक: तांदळाचे पीठ वापरून बनवलेले हे मोदक बाप्पाला खूप आवडतात.
तळणीचे/गव्हाचे मोदक: गव्हाचे पीठ, खवा, तूप आणि पीठीसाखर वापरून बनवलेले हे मोदक तेलात तळलेले असतात आणि चवीला रुचकर लागतात.
कणकेचे मोदक: हे मोदक कणकेपासून बनवले जातात.
बेसनाचे मोदक: बेसनाचे पीठ, तूप आणि पीठीसाखर वापरून हे मोदक बनवले जातात.
काजूचे मोदक: काजूपासून बनवलेले हे मोदक चवीला खूप छान लागतात.
अननस मोदक: पारंपरिक मोदकांव्यतिरिक्त अननसाचा वापर करून देखील मोदक बनवले जातात.
चॉकलेट मोदक: आधुनिक काळात चॉकलेटचा वापर करूनही मोदक बनवले जात आहेत.