चेहऱ्यावर पिंपल्स आलेत? आजपासूनच त्वचेची अशी काळजी घ्या

चेहरा दिवसातून दोनदा सौम्य फेसवॉशने धुवा

तेलकट, मसालेदार आणि जास्त साखर असलेले पदार्थ टाळा

भरपूर पाणी प्या, तणाव कमी ठेवा आणि चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळा

पिंपल्सची सूज आणि लालसरपणा कमी करण्यासाठी स्वच्छ कपड्यात बर्फ गुंडाळून दहा मिनिटे चेहऱ्यावर लावा

तसेच, हळद आणि मधाचा लेप लावल्याने पिंपल्स लवकर सुकतात

चेहरा पुसण्यासाठी मऊ टॉवेल वापरा आणि तो वारंवार बदला

कमीतकमी मेकअप करा आणि झोपण्यापूर्वी तो काढून टाका

त्वचेतील अतिरिक्त तेल शोषण्यासाठी मुलतानी मातीचा पॅक उपयुक्त ठरतो