जगाच्या ''या'' पर्वतावरून सूर्य दिसतो खूपच जवळ

पृथ्वीवर एक असे ठिकाण आहे, जिथून सूर्य अगदी जवळ असल्याचा अनुभव येतो

या ठिकाणाचे नाव आहे चिंबोराझो पर्वत

चिंबोराझो पर्वत हा दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर देशात आहे

हा पर्वत समुद्रसपाटीवरून 20 हजार 549 फूट उंचीवर आहे

पृथ्वीच्या केंद्रापासून चिंबोराझो पर्वताचे अंतर सहा हजार 384 फूट उंचीवर आहे

पृथ्वीच्या विशिष्ट आकृतीमुळे हा पर्वत पृथ्वीच्या केंद्रापासून सर्वाधिक दूर असलेला बिंदू आहे

विशेषत: या पर्वताच्या शिखरावर उभ्या असलेल्या व्यक्तीला सूर्य सर्वात जवळ असल्याची अनुभूती मिळते

दिसायला अतिशय सुंदर असला तरी चिंबोराझो पर्वतावरील वातावरण प्रतिकूल आहे

चिंबोराझो पर्वतावर हवा कमी प्रमाणात असल्यामुळे शरीराला कमी ऑक्सिजन मिळतो

तसेच, सूर्याची किरणे अतिशय तीव्र असल्याने गॉगलशिवाय डोळे उघडणेही कठीण होते

चिंबोराझो पर्वतावर येणारे ट्रेकर्स विशेष सनगिअर ग्लासेस, सुरक्षा साधने आणि योग्य उपकरणांसोबतच ट्रेकिंग करतात