Friday, January 23, 2026

केस गळतीच्या समस्या सध्या खूप वाढतायंत, घरगुती उपायांनी ते नियंत्रित करता येते. हे काही प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा

Editor Name: Jaimaharashtra News

कोरफडीचा ताजा गर काढून टाळूला लावल्यास केस गळणे थांबते व केस मऊ होतात

कांद्याच्या रसातील सल्फर केसांच्या मुळांना मजबूत करते आणि नवीन केस येण्यास मदत करते

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून त्याची पेस्ट तयार करुन केसांच्या मुळांना लावल्याने केस गळती कमी होते

खोबरेल तेलात कढीपत्ता गरम करून त्या तेलाने मसाज केल्यास केसांची मुळं मजबूत होतात

आवळा पावडर आणि लिंबाचा रस एकत्र करून लावल्याने केसांना पोषण मिळते आणि चमक येते

खोबरेल, बदाम किंवा ब्राह्मी पानांपासून तयार होणाऱ्या तेलाने हलक्या हाताने मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळती कमी होते

सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्यास केसांची वाढ होते व केस चमकदार बनवते