किटकांपासून उबदार कपड्यांचा बचाव करण्यासाठी ''हा'' उपाय करा
हिवाळा सुरू होताच बहुतांश लोक उबदार कपडे वापरण्यास सुरुवात करतात
मात्र अनेक महिन्यांपासून उबदार कपडे न धुतल्याने किंवा न वापरल्याने त्यावर जंतू वाढण्याची शक्यता असते
पण कपडे न धुता उबदार कपड्यांमधील जंतू कमी करण्यासाठी कोणता उपाय फायदेशीर ठरेल? पाहुयात
कडुलिंबाची पाने किंवा तेल उबदार कपड्यांना लावल्याने जंतू दूर होण्यास मदत होते
उबदार कपड्यांवर कापूरच्या गोळ्या ठेवल्याने जंतूंचा नाश होतो
वाळलेल्या लिंबाची किंवा संत्र्यांची साल उबदार कपड्यांमध्ये ठेवणे प्रभावशाली उपाय असू शकते
लवंग किंवा कॉफी पावडर फायदेशीर उपाय ठरू शकतात, ज्यामुळे उबदार कपडे वर्षानुवर्षे स्वच्छ आणि टिकवण्यास मदत करतात
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)