होळीच्या केमिकल रंगांमुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी व निस्तेज होते.

अशावेळी त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे

चेहऱ्यावर कठोर साबण वापरणे टाळा; त्याऐवजी सौम्य क्लिन्झिंग करा

माइल्ड फेसवॉश वापरा किंवा बेसन आणि दुधाचा लेप लावून हलक्या हाताने चेहरा धुवा

चेहऱ्याला आठवड्यातून 1–2 वेळाच स्क्रब करा

साखर, मध किंवा ओट्स आणि दही यांचा नैसर्गिक स्क्रब वापरा

जास्त स्क्रब केल्यास त्वचा आणखी रफ होऊ शकते

आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावा, तसेच कोरफड जेल किंवा नारळ तेल लावून हलक्या हाताने मसाज करा

भरपूर पाणी प्या. त्वचेचा निस्तेजपणा कमी करण्यासाठी शरीर आतून हायड्रेट ठेवा

रंग अजिबात निघत नसेल तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या

एअरपोर्टवरील कडक सुरक्षा नियमांमुळे काही वस्तूंवर पूर्ण बंदी असते

अनेकदा अज्ञानामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते, दंड भरावा लागतो किंवा सामान जप्त केले जाते

त्यामुळे विमानात चुकूनही ‘या’ वस्तू घेऊन जाऊ नयेत

सुरी, कात्री, ब्लेड, नेल कटर यांसारख्या धारदार किंवा टोकदार वस्तू विमानात नेण्यास मनाई आहे

फटाके, बारूद, रसायने यांसारखे स्फोटक साहित्य सुरक्षा नियमांनुसार बंदीस्त आहे

पेट्रोल, डिझेल, लायटर फ्लुइड, पेंट थिनर किंवा गॅसशी संबंधित कोणतेही पदार्थ विमानात नेण्यास सक्त मनाई आहे

100 मि.ली. पेक्षा जास्त द्रव पदार्थ विमानात (हँड बॅगेजमध्ये) घेऊन जाता येत नाहीत

तसेच, जास्त रोख रक्कम घेऊन प्रवास करत असल्यास ती संशयास्पद वाटल्यास तपासणी होऊ शकते

प्रवासापूर्वी आपल्या एअरलाईनच्या अधिकृत संकेतस्थळावर नियम व अटी नक्की तपासून घ्या