जगातील या देशांमध्ये एकही पर्वत नाही

जगात अनेक देश आहेत, जिथे निसर्गरम्य पर्वतरांगा आढळतात. त्यापैकी एक म्हणजे भारत. भारताच्या उत्तरेकडील हिमालय पर्वतरांग देशाच्या हवामानाचे संतुलन राखण्यास मदत करते

पण तुम्हाला माहीत आहे का? जगात असेही काही देश आहेत, जिथे एकही पर्वत नाही. चला तर पाहूया कोणती आहेत ही ठिकाणे

किरीबाती हा प्रशांत महासागरातील ओशनिया खंडातील एक बेटांचा देश आहे. हा देश ऑस्ट्रेलियाच्या पूर्व दिशेला आहे

किरीबाती देश विषुववृत्ताजवळ असल्यामुळे येथे सपाट भूभाग आढळतो. हा देश तीन मुख्य बेटसमूहांमध्ये विभागलेला आहे—गिल्बर्ट, फिनिक्स आणि लाइन आयलंड्स

डेन्मार्क हा उत्तर युरोपमधील देश आहे. या देशात उंच पर्वत नसले तरी काही टेकड्या आढळतात

व्हॅटिकन सिटी हे इटलीतील रोम शहरात स्थित आहे. समुद्रसपाटीपासून केवळ 19 ते 75 मीटर उंचीवर असल्यामुळे येथे कोणताही पर्वत तयार होऊ शकलेला नाही

मालदिव हा हिंद महासागरातील बेट असलेला देश आहे, जो भारताच्या जवळ आहे. पृथ्वीवरील सर्वाधिक सपाट देश म्हणून मालदिवची ओळख आहे. मालदिवची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून फक्त सुमारे 1.5 मीटर आहे

एस्टोनिया, लाटव्हिया, लिथुआनिया आणि द गॅम्बिया हे देश कमी उंची आणि सपाट भूभागासाठी विशेषत: ओळखले जातात