हिवाळ्यात ''या'' हिल स्टेशन्सना द्या भेट

हिवाळा सुरू झाल्यावर पर्यटक फिरायला जाण्याचा बेत आखतात

लोणावळा: लोणावळा हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे

लोणावळा हे ॲम्बी व्हॅली, पवना लेक, भुशी डॅम आणि इतर पर्यटनस्थळांमुळे लोकांना आकर्षित करते

पाचगणी: पाचगणी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे

पाचगणी हे समुद्रसपाटीपासून सुमारे 1 हजार 334 मीटर उंचीवर वसलेले आहे

हे ठिकाण उंच पर्वत, हिरव्यागार दऱ्या, धबधबे आणि घनदाट जंगलांनी वेढलेले आहे

भंडारदरा: सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले भंडारदरा एक सुंदर हिल स्टेशन आहे

भंडारदरामध्ये विल्सन डॅम, अंब्रेला फॉल्स आणि आर्थर लेकसारखी प्रमुख ठिकाणे आहेत

महाबळेश्वर: महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे

महाबळेश्वरमधील मॅप्रो गार्डन, वेन्ना लेक, प्रतापगड किल्ला, विल्सन पॉईंट, इत्यादी ठिकाणे खूप प्रसिद्ध आहेत