ट्रेकिंगला जाण्याचा विचार करताय? मग जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध गड-किल्ले
हिवाळ्यातील थंड हवामान आणि निसर्गाच्या सुंदर दृश्यांमुळे अनेक पर्यटक ट्रेकिंगची योजना आखतात
बहुतांश लोक या काळात महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जातात
राज्यातील हे किल्ले केवळ ऐतिहासिकच नाहीत तर निसर्गरम्य सौंदर्याने नटलेले आहेत
तोरणा किल्ला (पुणे): तोरणा किल्ला समुद्रसपाटीपासून तब्बल 1,403 मीटर उंचीवर वसलेला आहे
तोरणा किल्ल्याला "प्रचंडगड" असेही म्हटले जाते
प्रतापगड किल्ला (सातारा): प्रतापगड किल्ल्याचे बांधकाम 1656 ते 1658 दरम्यान झाले
किल्ल्याच्या परिसरातील दरी आणि हिरवाई ट्रेकर्सना अविस्मरणीय अनुभव देते
हरिशचंद्रगड किल्ला (अहिल्यानगर): हरिशचंद्रगड किल्ला ट्रेकिंगप्रेमी आणि निसर्गप्रेमी दोघांसाठीही स्वर्गासमान आहे
हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 1,424 मीटर उंचीवर आहे