विमानतळावरील लॅपटॉप तपासणीची प्रक्रिया

एक्स-रेमध्ये लॅपटॉप घन भिंतीसारखा (हलक्या काँक्रीटसारखा) दिसतो

लॅपटॉपची बॅटरी आणि मेटलचे कवच सावली निर्माण करते

त्यामुळे बॅगेतील इतर वस्तू दिसेनाशा होतात

यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांना ही सावली संशयास्पद वाटते

लॅपटॉपमध्ये एक शक्तिशाली लिथियम-आयन बॅटरी असते

ही बॅटरी खूप संवेदनशील असतात

ही बॅटरी खराब झाल्यास किंवा जास्त गरम झाल्यास आग लागण्याची शक्यता असते

मात्र लॅपटॉपला वेगवेगळ्या ट्रे मध्ये स्कॅन केल्याने बॅटरीतील बिघाड सहजपणे पाहणे शक्य होते

काही तस्कर लॅपटॉपमध्ये अवैध वस्तू लपवतात

यामुळे जगभरातील विमानतळावर सुरक्षा नियम कडक केले आहेत

तसेच लॅपटॉप बाहेर काढल्याने तपासणी प्रक्रिया जलद होते

परिणामी बॅग थांबवावी लागत नाही आणि रांग वेगाने पुढे सरकते