Friday, January 23, 2026

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात झाला

Editor Name: Jaimaharashtra News

राजकारणात येण्यापूर्वी बाळासाहेबांनी ''फ्री प्रेस जर्नल''मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम केले, त्यांच्या या कलेने भलेभले राजकारणीही त्यांना घाबरून होते

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी 19 जून 1966 रोजी ''शिवसेना'' या संघटनेची स्थापना केली

''80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण'' हे बाळासाहेबांचे ब्रीदवाक्य होते

90 च्या दशकात बाळासाहेबांनी प्रखर हिंदुत्वाचा विचार मांडला

''गर्व से कहो हम हिंदू है'' ही गर्जना करत त्यांनी देशभर हिंदूंचे संघटन केले

"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..." त्यांच्या या वाक्यानेच लाखो लोकांमध्ये चैतन्य निर्माण होत असे

बाळासाहेबांना चित्रकलेची प्रचंड आवड होती

17 नोव्हेंबर 2012 रोजी या महासूर्याचा अस्त झाला

मात्र, आजही त्यांचे विचार आणि त्यांनी घडवलेली ''शिवसेना'' ही ओळख प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जिवंत आहे

मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी आयुष्य वेचणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त शतश: प्रणाम!