डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये तमिळनाडू येथील रामेश्वरममध्ये झाला होता.
''''मिसाईल मॅन'''' म्हणून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ओळखले जाते.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं अभूतपूर्व योगदान आहे.
''''हे'''' आहेत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार.
छोटं लक्ष्य असणं गुन्हा आहे, त्यामुळे लक्ष्य नेहमी मोठे ठेवा.
जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल, तर आधी त्याच्यासारखे जळायला शिका.
आयुष्यात यश मिळवण्यासाठी प्रत्येक मनुष्याने अवघड परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे.
स्वप्न ते नाही, जे तुम्हाला झोपेत दिसते, स्वप्न ते आहे, जे तुम्हाला झोपू देत नाही.
यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी जिद्द आणि ताकद आवश्यक आहे, मग ते माउंट एव्हरेस्ट सर करणे असो किंवा व्यावसायिक ध्येय गाठणे.