गणपती बाप्पाला मोदक का अर्पण करतात? जाणून घ्या
मुंबई: गणपती बाप्पा मोरया! गणेशोत्सव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं आनंदाचा उत्सव, सजावट, आरती, भजन, नैवेद्य आदी.
या नैवेद्यातील प्रमुख पदार्थ म्हणजे मोदक होय.
अनेकांना हा प्रश्न पडला असेल आणि ते म्हणजे, गणपती बाप्पाला मोदकच का दाखवतात?
तर यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडलेली अनेक कारणे आहेत. चला तर जाणून घेऊया.
मान्यतेनुसार, भगवान परशुराम यांच्याशी झालेल्या युद्धात गणपतीचा एक दात तुटला होता, त्यामुळे बाप्पाला जेवताना खूप त्रास व्हायचा.
तेव्हा, गणपतीसाठी स्वादिष्ट मोदक बनवले जायचे, ज्यामुळे गणपती बाप्पाला खाताना त्रास होत नव्हता. तेव्हापासून गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवतात.
विशेष म्हणजे, मोदक बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, नारळ, गूळ, या साहित्यांची गरज असते, जे सहजपणे उपलब्ध असतात.
आयुर्वेदानुसारही मोदकाला मोठे महत्त्व आहे. गुळ आणि नारळ हे पचायला हलके असून शरीराला उष्णता आणि ताकद देणारे घटक आहेत.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)