Thursday, October 30, 2025

भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक ''डॉ. होमी जहांगीर भाभा''

Editor Name: Jaimaharashtra News

डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबईतील पारशी कुटुंबात झाला.

होमी भाभा यांचे वडील बॅरिस्टर होते. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतले होते.

लहानपणापासूनच होमी भाभा यांना पुस्तकाची आवड असल्याने त्यांनी घरातच वाचनालय बनवले.

विशेषत: या वाचनालयात इतर विषयांच्या तुलनेत ''विज्ञान'' या विषयाची पुस्तके अधिक होती.

असे सांगितले जाते की, या पुस्तकांमुळे त्यांना विज्ञान या विषयाची गोडी निर्माण झाली.

होमी भाभा यांचे शालेय ते पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले.

केंब्रिज विद्यापीठातून होमी भाभा यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

होमी भाभा यांनी 1934 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून आण्विक भौतिकशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली होती.

होमी भाभा यांना 1954 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

होमी भाभा यांचे 24 जानेवारी 1966 रोजी विमान दुर्घटनेत निधन झाले.

असे सांगितले जाते की, या विमान दुर्घटनेत अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा कारणीभूत आहे.