Tuesday, October 28, 2025

डिजिलॉकरमध्ये केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जाणून घ्या सोप्या स्टेप्स

Editor Name: Jaimaharashtra News

मोबाईलचे सिमकार्ड घेताना आणि बॅंकचे खाते उघडताना ओळखपत्राची आवश्यकता असते.

पूर्वी केवायसीची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची होती.

मात्र आता ई-केवायसीमुळे कागदपत्रांचे नियोजन सोपे आणि सुरक्षित झाले आहे.

डिजिलॉकरमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करा.

सर्वप्रथम, प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही डिजिलॉकर ॲप डाऊनलोड करा.

यानंतर, डिजिलॉकर ॲपमधील प्रोफाईलवर क्लिक करा.

तुमचं आधार डिजिलॉकरशी लिंक करण्यासाठी ''आधार'' वर क्लिक करा आणि ''तपशील आणा'' पर्याय निवडा.

या प्रक्रियेनंतर, तुम्ही नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी नमूद केलेल्या जागी एंटर करा.