Friday, October 31, 2025

''या'' पद्धतीने GPS ट्रॅक करतं तुमचं लोकेशन

Editor Name: Jaimaharashtra News

GPS मुळे, तुम्ही कुठे जाता आणि काय करता याची माहिती इतरांना सहजपणे मिळते.

मोबाईलमध्ये ॲप इन्टॉल आणि लोकेशन इनेबल केल्यानंतर तुमची काय करता हे सर्वकाही सर्व्हरमध्ये रेकॉर्ड होते.

IIT दिल्लीच्या कंम्प्युटर सायन्स या विभागाने संशोधन केले.

या संशोधनाच्या प्रमुख आणि IIT दिल्लीच्या प्राध्यापिका डॉ. स्मृती सारंगीच्या मते, तुमच्या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो.

उदा. तुम्ही काय करत आहात? कुठे जाता आणि आर्थिक व्यवहारांसंबंधीत सर्व माहिती त्यांना मिळते.

''या'' पद्धतीने तुम्ही तुमचा डॅटा सुरक्षित ठेवू शकता.

डॉ. स्मृती सारंगींच्या मते, ॲपला परमिशन देताना ''Only Using The App'' हा पर्याय निवडा.

जेव्हा ॲप वापरता, तेव्हा लोकेशन ऑन ठेवा.

बॅकग्राउंडला कोणतेही ॲप सुरू तर नाही ना? याची शहानिशा करा.

बॅकग्राऊंडमधील ॲपचे मायक्रोफोन बंद असल्याची खात्री करा. ॲप वापरल्यानंतर लोकेशन ऑफ ठेवा.

संवेदनशील विषयावर चर्चा सुरू असल्यास फोन लांब ठेवा आणि गरज नसल्यास ॲप बंद करा.