Saturday, November 01, 2025

रेल्वे प्रशासनाने ''हे'' ॲप लॉंच केले

Editor Name: Jaimaharashtra News

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि आरामदायी प्रवासासाठी रेल्वे प्रशानाने महत्त्वाचे बदल केले आहे.

रेल्वे प्रशासनाने 1 नोव्हेंबर रोजी ''रेलवन'' ॲप लॉंच केले आहे.

या ॲपच्या माध्यमातून प्रवासी आरक्षित आणि अनारक्षित टिकिटे बुक करू शकता.

रेल्वेचे लाईव्ह लोकेशन, कोणत्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे येणार, याबद्दलची सर्व माहिती ॲपमधून मिळेल.

''रेल्वे वन'' ॲपच्या माध्यमातून प्रवासी त्यांचं आवडतं सीट बुक करू शकतात.

यासह रेल्वे प्रशासनाने झोपेच्या वेळेबाबत नियम आखून दिले आहेत.

रात्री 10 ते सकाळी 6 ही झोपण्याची वेळ निश्चित केली आहे.

रेल्वे प्रशासनाने ॲडव्हान्स टिकिट काढण्याचा कालावधी 120 पासून 60 दिवसांवर केला आहे.