Sunday, November 02, 2025

नवलंच! ''या'' ठिकाणी होणार सोन्याच्या टॉयलेटचा लिलाव

Editor Name: Jaimaharashtra News

तुम्ही जगभरातील अनोख्या किंवा प्राचीन वस्तूंच्या लिलावाबद्दल ऐकला असाल.

या वस्तूंसाठी कोट्यावधी रुपयांची बोली लावली जाते.

पण तुम्ही कधी सोन्याच्या टॉयलेट सीटच्या लिलावाबद्दल ऐकलं का?

लंडनमध्ये बनवलेली सोन्याच्या टॉयलेटची सीट लिलावात जाणार आहे.

प्रसिद्ध इटालियन कलाकार मॉरिजिओ कॅटेलन यांनी या सोन्याच्या टॉयलेटची सीट तयार केली आहे.

न्यू यॉर्क येथील सोथेबीज या ठिकाणी सोन्याच्या टॉयलेटचा लिलाव होणार आहे.

या सोन्याच्या टॉयलेट सीटला ''अमेरिका'' असे नाव देण्यात आले आहे.

या सोन्याच्या टॉयलेट सीटची बोली 83 कोटी रुपयांपासून सुरू होणार आहे, असे सांगितले जात आहे.

सोन्याच्या टॉयलेट सीटला बनवण्यासाठी 101 किलो सोन्याचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.