लहान मुलांसाठी रेल्वे नियमात बदल

लहान मुलांसाठी रेल्वेकडून नवीन नियम जारी

पाच वर्षांखालील मुलांना विनातिकीट प्रवास आता शक्य

स्वतंत्र बर्थ बुक करायचा असल्यास पूर्ण भाडे भरावे लागणार

5 ते 12 वयोगटातील लहान मुलांसाठी मात्र वेगळे नियम आहेत

त्यांच्यासाठी ''नो सीट/नो बर्थ'' पर्याय निवडल्यास अर्धे भाडे भरावे लागणार

परंतु संपूर्ण बर्थ करायचा असल्यास, त्याचे पूर्ण भाडे भरावे लागणार

तिकीट बुक करताना मुलाचे अचूक वय नमूद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे

प्रवासादरम्यान मुलाचे वय प्रमाणित करणारे कागदपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे