पेन्शनधारकांनो सावधान, 'ही' चूक टाळा
सर्व पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र बँकेत सादर करणं बंधनकारक
''ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र'' सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025
मात्र यासाठी जेष्ठ नागरिकांना बँकेत तासनतास ताटकळत राहावं लागतं
पेन्शनधारकांची गैरसोय टाळण्यासाठीच केंद्राची ''Digital Life Certificate'' योजना
या योजनेद्वारे पेन्शनधारक घरबसल्या जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करू शकतात
ही प्रक्रिया सोपी आणि जलद असली तरी यात धोकाही तेवढाच जास्त आहे
ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र सुविधेमुळे आता सायबर गुन्हेगार सक्रिय झालेत
या गुन्हेगारांची नजर डिजिटल पेन्शनधारकांच्या आधार आणि इतर माहितींवर आहे
त्यामुळे सरकारने पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे
पेन्शनधारकांनी बॅंकसंबंधी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये
तसेच, सरकारी अधिकृत ॲपचाच वापर करा आणि संशयास्पद कॉल्स टाळावे
या सूचनांचे पालन केल्यास पेन्शनधारकांना अधिक फायदेशीर ठरेल