Friday, October 31, 2025

''या'' ॲपच्या मदतीने आधार कार्ड होणार सहजपणे अपडेट

Editor Name: Jaimaharashtra News

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) लवकरच एक नवीन ॲप लॉंच करणार आहे.

हे नवीन UIDAI ॲप ANDROID आणि IOS फोनच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.

या ॲपच्या मदतीने वापरकर्त्यांना त्यांच्या आधार कार्डवरील माहिती सहजपणे अपडेट करता येईल.

सध्याच्या, mAadhaar ॲपमुळे वापरकर्ते त्यांचा डाटा सेव्ह करू शकतात.

मात्र, नव्या ॲपमुळे वापरकर्ते आधार कार्डवरील माहिती सहजपणे अपडेट करू शकतात.

त्यामुळे, वापरकर्त्यांना सरकारी कार्यालयात जाऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करण्याची गरज नाही.

यासह, हे नवीन UIDAI ॲप ''फेस जनरेट'' तंत्रज्ञानाचा वापर करेल.

नवीन UIDAI ॲप वापरकर्त्याच्या पॅन कार्ड, पासपोर्ट यांसारख्या कागदपत्रांसोबत आधार कार्डवरील अपडेट मॅच करण्यास मदत करेल.

असे सांगितले जाते की, हे नवीन UIDAI ॲप डिसेंबर 2025 च्या अखेरपर्यंत लॉंच होईल.