Thursday, October 30, 2025

8 व्या केंद्रीय वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Editor Name: Jaimaharashtra News

कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

28 ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमडळाच्या बैठकीत 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मंजुरी देण्यात आली.

8 वा केंद्रीय वेतन आयोग देशातील आर्थिक स्थिती, महागाईचा दर, वित्तीय तुट आणि विकास आयोगाच्या गरजेवर लक्ष ठेवतील.

8 व्या केंद्रीय वेतन आयोगाला 18 महिन्यांच्या आत शिफारसी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वेतन आयोगाच्या शिफारशी दर दहा वर्षांनी लागू केल्या जातात. 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील.

यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांना थकबाकी स्वरूपात वेतनवाढीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात किती पटीने वाढ होईल? याची अधिकृत माहिती दिली नाही.

मात्र, असा अंदाज वर्तवला जात आहे की, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात 30-35 टक्के वाढ होऊ शकते.

यामध्ये, 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे.

8 व्या वेतन आयोगातंर्गत फिटमेंट फॅक्टर आणि भत्त्याच्या आधारे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात वाढ होणार आहे.

8 व्या वेतन आयोगातंर्गत फिटमेंट फॅक्टर 2.86 इतका असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भत्त्याचा निर्णय 8 वा वेतन लागू झाल्यानंतर होईल, तर नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर भत्ता शुन्य होईल आणि महागाईच्या आधरावर ठरेल.