जीपीएस स्पूफिंग म्हणजे काय?

जीपीएस स्पूफिंग हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे

या हल्ल्यात चुकीचे जीपीएस सिग्नल विमानाकडे पाठवले जातात

हे सिग्नल्स खऱ्या जीपीएस फ्रीक्वेन्सीवरच पाठवले जातात

त्यामुळे विमानाला बनावट लोकेशनची माहिती मिळते

पायलटला वाटतं की विमान पॉईंट A वर आहे

पण प्रत्यक्षात विमान पॉईंट B वर असतं

अशा गोंधळामुळे उड्डाण सुरक्षेला धोका निर्माण होतो

मात्र पायलट्सना अशा परिस्थितीचे प्रशिक्षण दिलेले असतं

ते फक्त जीपीएसवर अवलंबून राहत नाहीत

पायलट्स आयएनएस (Inertial Navigation System) चा वापर करतात

आयएनएस विमानातील सेन्सर्सवर आधारित सुरक्षित नेव्हिगेशन करतं