लाजाळूच्या पानाला हात लावताच वनस्पती आपली पाने आपोआपच मिटवून घेते
वनस्पतीच्या याच वैशिष्ट्यामुळे तिला लाजाळू हे नाव पडलं आहे
लाजाळू या वनस्पतीत औषधी गुणधर्म देखील आहेत
रक्तस्त्राव थांबविणे, खोकला, पित्त, मुळव्याध यावर उपाय म्हणून लाजाळूचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो
जखम भरण्यासाठी देखील लाजाळूचा उपयोग केला जातो
आयुर्वेदात सांगितलं आहे, की दमा आणि कफसाठी लाजाळूचा उपयोग केला जाऊ शकतो
ही वनस्पती मुख्यतः आफ्रिका खंडात मोठ्या प्रमाणात आढळते
आपण घरातील कुंडीमध्ये लाजाळूचं रोप लावू शकतो