कर्करोग हा जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे जागतिक आरोग्य संघटना (WHO) सांगते.

भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

दरवर्षी लाखो लोक कर्करोगामुळे आपले प्राण गमावत आहेत.

4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो.

जागतिक कर्करोग दिनाची सुरुवात युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) यांनी केली.

या दिवसाचा मुख्य उद्देश कर्करोगाविषयी जनजागृती वाढवणे हा आहे.

कर्करोगाची लक्षणे, निदान आणि उपचारांची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते.

सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोग ओळखला, तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.

आजही अनेक लोकांना कर्करोगाची प्राथमिक लक्षणे माहित नसतात.

यामुळे अनेक वेळा आजाराचे निदान उशिरा होते.

WHO नुसार, नियमित वैद्यकीय तपासणी कर्करोग रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

वेळीच निदान, योग्य उपचार आणि जागरूकता हाच कर्करोगाविरुद्धचा सर्वात प्रभावी उपाय आहे.