Sat. Jul 31st, 2021

‘बिननवरी’चा विवाह, एक हृद्य सोहळा!

गुजरातमध्ये 27 वर्षीय अजय बोरात या तरुणाचं लग्न पार पडलं. या लग्नात नवरदेव सजला होता, सगळे विधी पार पडत होते, 800 वराती आले होते… पण एकच गोष्ट नव्हती. ती म्हणजे नवऱ्याची नवरी…

बिनानवरीचं कसं काय पडलं लग्न?

प्रत्यक्षात अजय बोरात हा 27 वर्षांचा जरी असला, तरी तो मानसिकदृष्ट्या अक्षम आहे.

त्याला आई नाही. वडीलच त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

जेव्हा अजय इतरांच्या लग्नात जायचा, तेव्हा माझं लग्न कधी होणार अशी सातत्याने विचारणा करायचा.

मुलाची ही इच्छा  पूर्ण होणं कठीण होतं.

मात्र मुलाला ज्या लग्नसोहळ्याचं आकर्षण होतं, तो लग्नसोहळा पार पाडावा असा विचार वडिलांनी केला.

वडिलांनी नवरीशिवाय मुलाचं लग्न लावण्याचं ठरवलं आणि 2 लाखांचा खर्च करत मोठ्या थाटात मुलाचं लग्न लावलं.

आपलं लग्न होतंय या कल्पनेने त्याला खूप आनंद झाला.

त्याने नातेवाईकांसोबत डान्सही केला.

हा विवाहसोहळा पाहून सर्वांना गहिवरून येत होतं. आपल्या मतिमंद मुलाची इच्छा पूर्ण कऱण्यासाठी धडपडणाऱ्या वडिलांचं कौतुक करावं, तितकं थोडंच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *