Sat. Jul 31st, 2021

लग्नाच्या मांडवातच वधूवराचा घटस्फोट!

लग्नाच्या दिवशीच वधू वराचा घटस्फोट झाल्याचं कधी ऐकलंय का? पण असं घडलं, ते ही लग्नाच्या मांडवातच. गुजरातमधील गोंडल येथे अशी विचित्र घटना घडली.

नेमकं काय घडले या विवाहसोहळ्यात ?

गुजरातमधील गोंडल येथे एक विवाहसोहळा सुरू होता.

नवरा मुलगा अनिवासी भारतीय होता, मुलगी गुजरातचीच होती.

दोघांची फेसबुकवर एकमेकांशी ओळख झाली होती.

त्यांनी 2 महिन्यांपूर्वीच कोर्ट मॅरेज केलं होतं.

मात्र कुटुंबियाच्या आग्रहामुळे पारंपरिक पद्धतीने विवाह करायला तयार झाले.

त्यामुळे नवरदेव वरात घेऊन मांडवात दाखल झाला.

रीतीरिवाजानुसार विवाहसोहळा पार पडला.

त्यानंतर जेवणाची पंगत बसली. या पंगतीमध्ये जेवणावरून वधुवरांच्या कुटुंबात वाद झाला.

वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं. हे भांडण इतकं विकोपाला गेलं, की पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

तेवढ्यावरच प्रकरण थांबलं नाही, तर ताबडतोब मांडवातच वकिलांना बोलावून घटस्फोटासाठी दोघांनी सह्यादेखील केल्या. कायद्यानुसार घटस्फोट व्हायला काही वेळ लागणार असला, तरी वधू वर मांडवातच एककमेकांपासून दूर झाले. नलग्नात मिळालेल्या वस्तूही त्यांनी परत करून टाकल्या आणि सासर माहेरच्या मंडळींनी एकमेकांना दिलेल्या भेटीही परत घेण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *