Jaimaharashtra news

ऑलम्पिकमध्ये भारताने खातं उघडलं! मीराबाई चानूला रौप्य पदक!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पदकाचे खाते उघडले आहे. देशाला पहिले पदक एका महिलेने जिंकून दिले. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकून दिले. टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारताला पदक मिळाले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानू देशाला पहिलं पदक मिळून दिले. मीराबाईने एकूण २०२ किलो वजन उचलले. या प्रकारात चीनच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले.
मीराबाईला गेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये अपयश आले होते. त्यानंतर तिच्यावर टीका देखील झाली होती. पण गेल्या चार वर्षात मीराबाईने कठोर मेहनत घेतली आणि त्याचे यश आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळाले.
यापूर्वी कर्णम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. चीनच्या होऊ झिऊईने कुल २१० किलो (स्नॅच ९४ किलो, क्लीन आणि जर्क ११६ किलो) वजनासह सुवर्ण पदक पटकावले. इंडोनेशियाची ऐसाह विंडी कांटिकाने कुल १९४ किलोसह कांस्य पदकावर नाव कोरले.
२६ वर्षीय चानूने मागील ऑलिम्पिकमधील उणीवा दूर करुन भारताचे पदतालिकेचे खाते उघडले. आपल्या खेळात बदल करत चानूने दमदार कामगिरी करुन दाखवली. १ मे पासून स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग ट्रेनिंगसाठी ती अमेरिकेला गेली होती. खांद्याच्या दुखापतीवरील उपचारानंतर तिने ऑलिम्पिकमध्ये दिमाखदार कामगिरी केलीये.

Exit mobile version