Tue. Jan 28th, 2020

काळ्या जादूच्या नावाखाली फसवणाऱ्या उच्चशिक्षित मुलाचा पर्दाफाश!

‘तुम पर काला जादू है’ असे सांगून पुण्यातील एका महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुभम शेतीया असं या आरोपी तरुणाचं नाव असून तो 21 वर्षांचा आहे.

त्याने आतापर्यंत युट्युब आणि सोशल मीडियावर जोतिषशास्त्राची जाहिरात करून 30 ते 40 नागरिकांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरातील एका महिलेने तक्रार दिली होती.

फिर्यादी महिलेने एका जोतिषशास्त्राच्या जाहिरातीतील मोबाईलवर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने ज्योतिषी मोहम्मद अली बोलत असल्याचं सांगितलं.

फिर्यादी महिलेने आपली अडचण सांगितली असता त्याने ‘ तुम पर काला जादू है’ असे सांगत यावर उपाय म्हणून होमहवन करावे लागेल, बळी द्यावा लागेल असं सांगितलं.

यासाठी फिर्यादीकडून 1 लाख 6 हजार रुपये घेतले.

परंतु यानंतरही आयुष्यात फरक पडला नाही आणि ज्योतिषी आणखी पैसे मागत होता.

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिने सायबर पोलिसात तक्रार दिली.

त्यानंतर सायबर पोलिसांच्या एका पथकाने राजस्थानात जाऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून एक लाख रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, आता अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *