Wed. Oct 5th, 2022

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला राषट्रगीताचा अवमान

तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. मुंबईत ममता बॅनर्जी यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली मात्र यादरम्यान त्यांना राष्ट्रगीताचा विसर पडल्याचे चित्र समोर आले.

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत गायला सुरूवात केली. परंतु त्यांनी राष्ट्रगीत अर्धवट गाऊनच थांबवले. तसेच त्यांनी माध्यमांसमोर खाली बसून राष्ट्रगीत गायल्या. राष्ट्रगीत अर्धवट गाऊन थांबवणे तेही खाली बसून, त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. जय महाराष्ट्र, जय बंगला, जय भारत असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत थांबवले. त्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत.

ममता बॅनर्जी यांनी बसून राष्ट्रगीत गायला सुरूवात केली. ‘जन गण मन अधिनायक जय है’, हे वाक्य त्या बसून म्हणाल्या. त्यानंतर त्या पुढच्या ओळी ‘भारत भाग्यविधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग’, हे त्या उभे राहून म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी लगेचच जय महाराष्ट्र, जय बंगाल, जय भारत, असे म्हणत त्यांनी राष्ट्रगीत थांबवले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.