Mon. Jan 24th, 2022

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर

तृणमुल काँग्रेसचे अध्यक्ष आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी आज दादरमधील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तसेच त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक येथे भेट घेणार आहेत.

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून ती दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. दरम्यान पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटसाठी आमंत्रण करण्यासाठी ममता बॅनर्जी १ डिसेंबर रोजी मुंबईतील उद्योगपतींना भेटणार आहेत. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने त्या मुंबईत आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल बाहेरही तृणमूल काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्याच्या तयारित आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यामध्येही त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहेत.

मागील काही दिवस ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय भेटीगाठी घेतल्या. मात्र काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली नाही. त्यामुळेच ममता बॅनर्जी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तसेच यांच्या भेटीमध्ये देशातील राजकीय मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *