Wed. Aug 10th, 2022

पंतप्रधान मोदींची भविष्यवाणी खरी ठरली!

पश्चिम बंगाल येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भविष्यवाणी खरी ठरली आहे.

‘ममतादीदी, तुम्ही बंगालमध्ये नंदिग्रामंच काय, इतरत्र कुठेही गेलात तरी बंगालची जनता तुम्हाला हरवण्यासाठी सज्ज आहे’,असं पंतप्रधान मोदींनी प्रचाराच्या वेळी म्हटलं होतं.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा  ममता बॅनर्जी  यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.दरम्यान ममता बॅनर्जींचा पराभव झाला आहे.

या चुरशीच्या लढतीत भाजपचे सुवेंदू अधिकारी विजयी झाले आहेत. नंदीग्राममध्ये १६६२ मतांनी ममता यांचा पराभूत झाल्या आहेत. नंदीग्राममधील या अटीतटीच्या लढतीत भाजपचा विजय झाला आहे.

दरम्यान नंदीग्रामच्या निकालात काहीतरी काळंबेरं असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. सोमवारी संध्याकाळी ममता बॅनर्जी राज्यपालांची भेट घेणार असून पुनर्मतमोजणीची मागणी करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.