Jaimaharashtra news

बंगाल लुटला जाताना दीदी गप्प

पश्चिम बंगाल: देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागले. मात्र निवडणूक निकालानंतर बंगालमध्ये हिंसाचार सुरूच आहे. पश्चिम बंगालमधील निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांवर ठिकठिकाणी हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यांमध्ये गेल्या २४ तासांत जवळपास ९ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे.

पश्चिम बंगालची निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली होती. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचे दिसून येत आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांवरसुद्धा हल्ले करण्यात येत आहेत. विजयी जल्लोष करू नका असा आदेश असतानाही निकलानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुका काढल्या आणि विरोधकांच्या घरांवर हल्ले केले.

तृणमूलच्या हिंसाचाराचा डाव्यांकडूनही निषेध

डाव्यांनी तृणमूलच्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. निवडणूक निकालानंतर कोरोना नियंत्रणाला प्राथमिकता द्यायला पाहीजे, असं सांगत माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा उन्माद योग्य नाही असं स्पष्टपणे म्हटलं आहे.

या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्यपालांना निवदेनही सादर केले आहे. पश्चिम बंगालमधील भटपारा येथील घोषपारा रोडवरील भाजप कार्यालय आणि काही दुकानांमध्ये अज्ञातांनी तोडफोड केली. दुकानांची शटर उघडून आतील सामान लुटलं गेलं आहे. परिसरात बॉम्बही फेकण्यात आले आहेत. पोलीस कारवाई तोकडी पडेल अशी स्थिती सध्या बंगालमध्ये आहे.

 

Exit mobile version