Sat. Aug 13th, 2022

रोहित-राहुलचा शतकी धमाका, विंडिजला 388 धावांचे आव्हान

विशाखापट्टणम : टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी 388 धावांचे आव्हान दिले आहे. अखेरच्या काही ओव्हरमध्ये श्रेयस अय्यर-ऋषभ पंतने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने 5 विकेट गमावून 387 धावा केल्या आहेत.

अखेरच्या काही ओव्हरमध्ये पंत-अय्यर जोडीने विंडिजच्या बॉलिंगची पिसे काढली. तसेच सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुलने शतकी कामगिरी केली.

विंडिजने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडले. ओपनिंगसाठी आलेल्या रोहित शर्मा- केएल राहुलने चांगली सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी 227 धावांची पार्टनरशीप केली.

ही जोडी अलझारी जोसेफने तोडली. लोकेश राहुल 102 रन करुन बाद झाला. यानंतर आलेल्या कॅप्टन विराट कोहली गोल्डन डक झाला.

विराट कोहली पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात पहिल्याच बॉलवर आऊट झाला. विराटनंतर श्रेयस अय्यर मैदानात आला. रोहितने विंडिजच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. रोहित-श्रेयस यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 60 धावांची पार्टनरशीप केली.

रोहित शर्मा 159 धावांवर बाद झाला. या खेळीत रोहितने 17 फोर आणि 5 सिक्स लगावले. रोहितनंतर आलेल्या ऋषभ पंतने अय्यर सोबत विंडिजच्या बॉ़लर्सना चांगलेच धुतले.

ऋषभ पंतने अवघ्या 16 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने 39 धावा केल्या. तर अय्यरने 32 बॉलमध्ये 53 रन केल्या. या इनिंगमध्ये त्याने 4 सिक्स आणि 3 फोर लगावले.

विंडिजकडून शेल्डन कोट्रेलने 2 तर किमो पॉल, अल्झारी जोसेफ आणि किरॉन पोलार्ड या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.