Jaimaharashtra news

वेस्ट इंडिजचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

तिरुवनंतपुरम : टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात आज दुसरी टी-20 मॅच खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी 7 वाजता तिरुवनंतपुरम येथे हा सामना खेळला जाणार आहे.

पहिल्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 6 विकेटने पराभव केला होता. त्यामुळे टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आजची दुसरी टी-20 मॅच जिंकून मालिका जिंकण्याची संधी टीम इंडियाला आहे. तर मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विंडिजला हा सामना जिंकावा लागणार आहे.

या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. तर विंडिज टीममध्ये एक बदल करण्यात आला आहे. टीममध्ये दिनेश रामदिन ऐवजी निकोलस पुरनला संधी देण्यात आली आहे.

प्लेइंग -11

टीम वेस्टइंडिज
एव्हीन लुईस, लेंडल सिमन्स, ब्रेंडन किंग, शिमरन हेटमायर, कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलास पूरन (विकेटकीपर), जेसन होल्डर, कारी पीएरे, हेडन वॉल्श, शेल्डन कोट्रेल आणि केसरिक विल्यम्स

टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेट कीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार

Exit mobile version