Mon. Dec 6th, 2021

INDvsWI, 2ND ODI : वेस्ट इंडिजचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

विशाखापट्टणम : विडिंज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा वनडे सामना आज खेळण्यात येणार आहे. ही मॅच विशाखापट्ट्णम येथे खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात 8 विकेटने पराभव केला होता. त्यामुळे विंडिजने 3 सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाला आजचा दुसरा सामना जिंकण्याचे आव्हान असणार आहे. टीम इंडियामध्ये मुंबईकर शार्दुल ठाकूरचे आगमन झाले आहे.

विंडिंज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या बॅट्समन आणि बॉलर्सने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुऴे आज टीम इंडियाच्या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

दोन्ही संघात बदल

दोन्ही टीममध्ये बदल करण्यात आले आहेत. वेस्ट इंडिजमध्ये एव्हिन लुईस आणि खॅरी पिएर यांचं आगमन झाले आहे. सुनील एम्ब्रीस आणि हेडन वॉल्श यांना बाहेर बसवण्यात आले आहे. तर टीम इंडियात शिवम दुबेच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केदार जाधव, रविंद्र जडेजा, दिपक चहार, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव

टीम वेस्टइंडिज : एव्हिन लुइस, शाई होप, शिमरोन हे्टमायर, निकोलस पूरन, रोस्टन चेस, किरॉन पोलार्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, खॅरी पिएर, अल्झारी जोसेफ आणि शेल्डन कोट्रेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *