Sat. Sep 21st, 2019

#WorldCup2019 अखेरच्या सामन्यात विंडिज विजयी

0Shares

विंडिज आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात विंडिजने विजय मिळवला आहे. विंडिजने अखेरच्या सामन्यात विजय मिळवल्यामुळे अनेक चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे. मात्र अफगाणिस्तानने यंदाच्या विश्वचषकात एकही विजय मिळवलेला नाही. विंडिजने अफगाणिस्तानला 312 दिले. मात्र आव्हान पूर्ण करण्यात अफगाणिस्तान अपयशी ठरली.

अखेरच्या सामन्यात विंडिज विजयी –

विंडिज आणि अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी सामना रंगला.

नाणेफेक जिंकून विंडिजने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

विंडिजने 312 धावांचे आव्हान अफगाणिस्तानपुढे ठेवले.

या आव्हानाचा पाठलाग करताना मोठे फटके मारण्याच्या नादात अफगाणिस्तानला सामना गमवावा लागला.

अफगाणिस्तानच्या रहमत शाहने 62 धावा केल्या तर इक्राम अलिखीलने 86 धावा केल्या.

मात्र हे दोघेही तंबूत परतल्यानंतर इतर फलंदाजांनी चांगली खेळी केली नाही.

त्यामुळे अफगाणिस्तानने हा सामना गमावला आहे.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *