Wed. Jul 28th, 2021

ऐन दुष्काळात पुण्यात हजारो लिटर पाणी वाया

एकीकडे पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट आणि पुणेकरांना सातत्याने पाणी जपून वापरावे असा उपदेश प्रशासन सतत करत असते. परंतु पाण्याची गळती व चोरी थांबविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना राबविण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.यात पाटबंधारे खात्याबरोबरच मनपाचे ही दुर्लक्ष होत आहे. त्यातच  पुण्याच्या विमाननगर चौक येथील दत्तमंदिराजवळ पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. या गोष्टींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

पुण्यात हजारो लिटर पाणी वाया

पुण्यात आधीच जेमतेम  पाणी असल्याने सतत पाणी कपात असते.

पाणी काटकसरीने वापरलं जावं असताना दुष्काळात तेरावा असा प्रकार समोर आला आहे.

पुण्याच्या विमाननगर चौक येथील दत्तमंदिराजवळ पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे काल रात्री साडे अकरापासून हे पाणी वाहत असल्याचं स्थानिकांच म्हणणं आहे.

तर स्थानिकांनी तक्रार देऊनही त्यावर कोणतीही कारवाई तातडीनं न झाल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली.

दरम्यान काही दिवसांपुर्वी शिवणे येथे मुख्य रस्त्यावरील अनंत मंगल कार्यालयाच्या मागे मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी वाहताना दिसले.

यामध्ये हजारो लीटर पाण्याची गळती गेले अनेक वर्ष २४ तास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *