Sat. May 30th, 2020

पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेवर चर्चगेटच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरील माटुंगा आणि माहीम दरम्यान रुळांना तडे गेल्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत प्लॅटफॉर्म नं.2 वरून चर्चगेटला गाड्या सध्या जाणार नाहीत.

धीम्या मार्गावरील लोकल सेवा आता जलद मार्गावर वळवण्यात आली आहे.

माटुंगा, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी या स्टेशन्सवर लोकल्स थांबत नसल्यमुळे प्रवाशांना मनस्ताप होतोय.

तसंच वांद्रे स्टेशनमध्येही अनेक लोकल्स रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून रुळ दुरुस्तीचं काम सुरू असलं, तरी वेळापत्रक कोलमडल्यामुळे ऐन कामाच्या वेळेत चाकरमान्यांचा खोळंबा होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *