Tue. Jan 18th, 2022

6 मार्च रोजी आमलकी एकादशी, कसे करावे या एकादशीचे व्रत?

शुक्रवारी 6 मार्च रोजी ‘आमलकी एकादशी’ आहे. या एकादशीला भारतीय परंपरेत विशेष पौराणिक महत्त्व आहे. वर्षभरात येणाऱ्या 14 एकदशींपैकी ही एक एकादशी होय, जिला वेगळे धार्मिक महत्व आहे. या एकादशीला ‘रंगभरनी एकादशी’ असेही बंबोधले जाते. आमलकी एकादशीच्या दिवशी करण्यात येणारे व्रत हे प्रभावी मानले जाते.

काय आहे आमलकी एकदाशीचे व्रत?

आमलकी एकादशीला पहाटे लवकर उठून संकल्प करावा.

आमलकी एकादशीला आवळ्याला विशेष महत्त्व असते.

व्रतादरम्यान आवळ्याच्या झाडाच्या परिसराची स्वच्छता करावी.

तेथे कलशाची स्थापना करून भगवान श्रीविष्णूंची पूजा करावी.

कलशाजवळ साजूक तुपातला दिवा लावावा.

भगवान विष्णूंची आरती म्हणून नैवेद्य दाखवावा.

दिवसभर उपवास करणे आवश्यक असून दिवसातून एकदाच फलाहार करावा.

व्रतासाठी आवळ्याचे झाड नसल्यास, पाट मांडून किंवा चौरंगावर श्रीविष्णूमूर्तीची प्रतिष्ठापना करून मनोभावे पूजा करावी.

व्रतस्थ राहून श्री विष्णू सहस्रनामनाचे पाठ करावे.

दुसऱ्या दिवशी गरीब ब्राह्मणाला अन्नदान आणि दक्षिणा देऊन व्रताचे उद्यापन करावे.

ज्यांना हे व्रत करणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी अत्यंत सोपा उपाय आहे. व्रत करून शकणाऱ्यांनी आवळ्याचे सेवन करावे.

फलप्राप्ती

हे व्रत सर्वोत्तम, कल्याणकारी आणि फलदायी असते. हे व्रत करणाऱ्याच्या महापातकांचाही संपूर्ण नाश होतो. भगवान विष्णू हे लक्ष्मीपती असल्यामुळे विष्णूंचं हे व्रत केल्याने धनधान्य, संपत्ती प्राप्त होते. कुटुंबाची भरभराट होऊन समृद्धी मिळते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *