Fri. Sep 30th, 2022

‘लॉक डाऊन’ म्हणजे काय?

सध्या महाराष्ट्रात Corona Virus च्या प्रादुर्भावाच्या दुसऱ्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे सरकार सावध झालं असून, लॉक डाऊनच्या दिशेनं पावलं पडत असल्याचं एकून उपाययोजनांवरून दिसत आहे.

संसर्गजन्य आजारांना रोखण्यासाठी गर्दी कमी करणं हाच प्रभावी उपाय ठरतो. त्यामुळे सरकारनं त्या दिशेनं काम सुरू केलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसोबतच व्यायामशाळा, जलतरण तलाव, सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

स्पेन, इटली या देशांनी ‘लॉक डाऊन’चा पर्याय निवडला आहे. या ठिकाणी लोक आपल्या घरात बंद आहेत. अन्न आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा त्यांना आहे.

‘लॉक डाऊन’ झालं तर परिस्थिती कशी असणार?

1. अत्यंत दुर्मिळ परिस्थितीत ‘लॉक डाऊन’ केलं जातं.

2. Lock Down दरम्यान नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे जाण्यास बंदी घालण्यात येते.

३. Lock Down चा निर्णय संभाव्य धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन घेतला जातो.

4. Lock Down किती कालावधीसाठी ठेवायचा हे संबंधित स्थितीवर अवलंबून आहे.

5. Corona ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली, तर महाराष्ट्रात लॉक डाऊन लागू केला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.